शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवी; भक्तांनी अर्पण केल्या जुन्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 15:58 IST

यंदा लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला.

ठळक मुद्देयंदा लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला. चलनातून रद्द झालेल्या नोटा दिलेल्या मुदतीत व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. चलनातून बाद झालेल्या नोटा लोकांनी थेट लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केल्याचं उघड झालं आहे

मुंबई, दि. 9- नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. तसंच दर्शनाला येणारे भाविक रिकाम्या हाताने न येता राजासाठी सोन्या-चांदीच्या वस्तूही घेऊन येतात. तर काही जण पैशाचं दान लालबागच्या राजाच्या दानपेटीत टाकतात. दरवर्षी करोडे रूपये राजाच्या दानपेटीत जमा होतात. यंदा मात्र लालबागच्या राजाच्या दरबारात फसवाफसवीचा कारभार पाहायला मिळाला. जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांकडे या नोटा तशाच राहिल्या. चलनातून रद्द झालेल्या नोटा दिलेल्या मुदतीत व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. चलनातून बाद झालेल्या नोटा लोकांनी थेट लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केल्याचं उघड झालं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीला येत्या नोव्हेंबर महिन्याच एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारने दिलेल्या मुदतीत अनेकांना नोटा बदलून घेता आल्या नाहीत. त्यामुळे स्वत:कडे राहिलेल्या नोटा गणेशभक्तांनी राजाच्या चरणी अर्पण केल्या आहेत. लालबागच्या राजाचे दर्शन घेत चलनातून बाद झालेल्या एक हजाराच्या नोटांचं दान करत पुण्य कमावण्याचा प्रयत्न काहींनी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. लालबागचा राजा गणपतीच्या दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजाराच्या ११० जुन्या नोटा सापडल्या आहेत. या नोटांचं एकुण मुल्य १ लाख १० हजार इतकं आहे.यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दानपेटीत ५ कोटी ८० लाखांचं दान जमा झालं आहे. त्यापैकी १ लाख १० हजार रुपयांच्या चलनातून रद्द झालेल्या नोटा आहेत.

दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सवाच्या काळात, लालबागच्या राजाच्या दानपेटीत तब्बल 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली आहे. त्यापैकी 1 लाख 10 हजार जुन्या हजारांच्या नोटांच्या स्वरुपात आहेत.

गेल्या वर्षीपेक्षा कमी दानयंदा लालबागच्या दानपेटीत 5 कोटी 80 लाखांची रोकड जमा झाली असली, तरी ती गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. कारण गेल्यावर्षी ही रक्कम तब्बल 8 कोटी इतकी होती. यावर्षी 29 ऑगस्टला झालेल्या तुफान पावसामुळे भाविकांनी घरी राहणंच पसंत केलं होतं. त्यामुळे यंदा रोख रक्कम कमी जमा झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच नोटाबंदीचाही परिणाम झाल्याचा अंदाज आहे.

5.8 कोटी रुपये, 5.5 किलो सोनं, 70 किलो चांदीलालबागच्या दरबारात भक्तांनी भरभरुन दान दिलं आहे. यामध्ये रोख रकमेसह तब्बल 5.5 किलो सोनं आणि 70 किलो चांदीचा समावेश आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव