शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस जानेवारीमध्ये : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 18:40 IST

महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : आपत्ती निवारणासंदर्भात चर्चा, संशोधन व्हावे, यासाठी ‘फ्युचर वी वाँट – ब्रिजिंग गॅप बिटविन प्रॉमिसेस अँड ॲक्शन’ या संकल्पनेवर आधारित चौथी जागतिक आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 या दरम्यान मुंबई आयआयटी येथे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार हे या जागतिक परिषदेचे मुख्य आयोजक आहे. या परिषदेत जगातील शंभरहून अधिक देशातील पंधराशे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

परिषदेसाठी सुकाणू समितीची पहिली बैठक आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक दौलत देसाई, आपत्ती व्यवस्थापन उपक्रम आणि अभिसरण सोसायटीचे (Disaster Management Initiative and Convergence Society) सल्लागार व माजी केंद्रीय सचिव पी. जी. धार चक्रवर्ती आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाबरोबरच भारतीय प्राद्योगिक संस्था, मुंबई (आयआयटी), डीएमआयसीएस, टाटा सामाजिक संस्था हे या परिषदेचे सह आयोजक आहेत. या जागतिक परिषदेत देशभरातील विविध राज्य सरकारे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, युनिसेफ जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्र संघाचे प्रतिनिधी, आपत्ती निवारणाशी संबंधित विविध स्वयंसेवी संस्था, विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक, तज्ज्ञ व्यक्ती जगभरातून उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या ठिकाणी आपत्ती निवारण विषयक प्रदर्शन सुध्दा मांडण्यात येणार आहे.

29 जानेवारी 2019 रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. आपत्ती निवारणासंदर्भातील जागतिक संरचनेच्या अंमलबजावणीमधील आव्हानांवर या परिसंवादात चर्चा होणार आहे. परिषदेत विविध सत्रांमध्ये आठ विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये जागतिक पातळीवरील तज्ज्ञ व्याख्याने देणार आहेत. तसेच विविध संशोधकांना परिषदेत आपले शोध निबंध मांडता येणार असून हे शोध निबंध नंतर जागतिक पातळीवरील प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या परिषदेतील मांडण्यात येणारे शोध निबंध, संशोधन व नाविन्यपूर्ण स्टार्टअपसाठी पारितोषिके देण्यात येणार आहेत. येत्या 10 सप्टेंबरपासून 31 ऑक्टोबरपर्यंत लघुनिबंध पाठविता येतील. परिषदेत लोकप्रतिनिधी, विविध शहरांचे महापौर, आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.

डीएमआयसीएसच्या वतीने पहिली आपत्ती व्यवस्थापन काँग्रेस हैद्राबाद येथे 2008 मध्ये झाली. त्यानंतर दुसरी सन 2015 व तिसरी परिषद सन 2017मध्ये विशाखापट्टणम येथे झाली. तिसऱ्या जागतिक परिषदेत 56 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रchandrakant patilचंद्रकांत पाटीलMumbaiमुंबई