शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 06:24 IST

राज्यात ११ मतदारसंघांमध्ये आज होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चौथ्या टप्प्याच्या प्रचारात उडालेला आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा खाली बसल्यानंतर उद्या सोमवारी राज्यातील ११ मतदारसंघांत मतदान होत आहे. या  टप्प्यात मुलगा, सून, बहीण यांना निवडून आणण्यासाठी  बाप, सासरे आणि भाऊ अशा नात्यांची कसोटी असून या निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे,  डॉ.विजयकुमार गावित हे विद्यमान मंत्री आणि के.सी. पाडवी आणि एकनाथ खडसे हे माजी मंत्री या दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राज्यातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या ११ लोकसभा मतदासंघांमध्ये उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. मतदारांना  उन्हाच्या झळांचा त्रास होऊ नये, म्हणून निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या  ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या आहेत.

या लढतींकडे असेल लक्ष 

- अहमदनगर : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संपूर्ण शक्ती मुलगा सुजयच्या मागे उभी केली आहे, तर या निमित्ताने नगर जिल्ह्यातील विखे विरोधक एकत्र आले आहेत. त्यांना शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांचे आव्हान आहे.  

- बीड : माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे बंधू कृषिमंत्री धनंजय मुंडे ताकदीनिशी उतरले आहेत. पंकजा यांना शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांचे आव्हान आहे.    

- औरंगाबाद : शिंदेसेनेचे संदीपान भुमरे, उद्धवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत.    

- शिरुर : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील लढाईकडे ‘शिवाजी विरुद्ध संभाजी’ म्हणून पाहिले जाते.  

- नंदुरबार : विद्यमान मंत्र्याची मुलगी विरुद्ध माजी मंत्र्याचा मुलगा असा सामना. डॉ.हिना गावित विजयाची हॅटट्रिक साधतील का, याची उत्सुकता. 

- जळगाव : उद्धवसेनेचे करण पवार व भाजपच्या स्मिता वाघ यांच्यात लढत.  करण पवार यांना भाजपचे मावळते खासदार उन्मेष पाटील यांचे पाठबळ असल्याने ही भाजप विरुद्ध भाजप लढत मानली जाते.  

- रावेर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात सरळ सामना.    

- जालना : विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे रावसाहेब दानवे यांना काँग्रेसचे कल्याण काळे यांचे आव्हान.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Votingमतदान