चौघा सराईत दरोडेखोरांना अटक

By Admin | Updated: September 20, 2016 02:58 IST2016-09-20T02:58:02+5:302016-09-20T02:58:02+5:30

मध्यप्रदेशात शस्त्राच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या मुंबईतील चौघा सराईत दरोडेखोरांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली

Fourth Saraiet Dacoits arrested | चौघा सराईत दरोडेखोरांना अटक

चौघा सराईत दरोडेखोरांना अटक


मुंबई : मध्यप्रदेशात शस्त्राच्या धाकाने व्यापाऱ्यांना लुटणाऱ्या मुंबईतील चौघा सराईत दरोडेखोरांना गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख सव्वा लाख रुपये, चार पिस्तुल अन्य साहित्य जप्त केले. इलियास उर्फ बचकाना उर्फ समीर अजीज खान (वय ३६), शफीक खान, रमीझ उर्फ बंकू झाकीर शेख (२६), वसीम सत्तार खान (२५) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर उज्जैन, देवास शहरातील विविध पोलीस ठाण्यात २५ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
उज्जैन, देवास याठिकाणी गेल्या तीन वर्षात भरदिवसा व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून, काहीवेळा गोळीबार करुन लुटण्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्याबाबत तेथील गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुन्हेगार हे मुंबईतील असून गुन्हा करून पुन्हा मुंबईला जात असल्याचे स्पष्ट झाले होते.
त्याबाबत मध्य प्रदेश पोलिसांकडून आलेल्या माहितीनुसार गुन्हा अन्वेषण शाखेच्या कक्ष-३च्या पथकाने रविवारी रात्री अटक केली. चौघाच्याकडून रोख रक्कम व गुन्ह्यासाठी वापरले पिस्तुल, तीन कार, दोन मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आल्याचे वरिष्ट निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Fourth Saraiet Dacoits arrested