एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

By Admin | Updated: March 2, 2015 01:54 IST2015-03-02T01:54:43+5:302015-03-02T01:54:43+5:30

शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांमध्ये पती, गर्भवती पत्नी व दोन चिमुकल्यांचा

Fourth death in a single family death | एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

नांदेड : शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला़ मृतांमध्ये पती, गर्भवती पत्नी व दोन चिमुकल्यांचा समावेश आहे़ ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास नांदेड शहरानजीक गाडेगाव रस्त्यावरील मुजाहिद चौक परिसरात घडली़ शेख समद शेख हुसेन (२६), शेख आसमा बेगम शेख समद (२४), शेख जोहा शेख समद (३) आणि शेख बिलाल (२) अशी मृतांची नावे आहेत़
फातेमा हायस्कूलजवळ शेख समद यांचे घर आहे़ शनिवारी रात्री घरातील सर्वजण झोपेत होते़ पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक घराला आग लागली. काही समजण्यापूर्वीच आगीने रौद्ररूप धारण केले़ यात शेख समद शेख हुसेन, शेख आसमा बेगम शेख समद (२४) यांचा जागीच मृत्यू झाला़ गंभीर भाजलेला शेख बिलालचा रुग्णालयात नेताना, तर, शेख जोहाचा जिल्हा रुग्णालयात दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला़ आगीचे नेमके कारण हे अद्याप समजू शकले नाही. मात्र घरातील दूरचित्रवाणी संच जळालेले दिसत असल्याने शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला़ (वार्ताहर)

Web Title: Fourth death in a single family death