पोलीस भरतीदरम्यान चौथ्या तरूणाचा मृत्यू
By Admin | Updated: June 14, 2014 13:51 IST2014-06-14T12:20:10+5:302014-06-14T13:51:59+5:30
पोलीस भरतीदरम्यान जखमी झालेल्या राहुल सपकाळ या तरूणाचा मृत्यू झाला असून गेल्या आठवड्याभरातील ही चौथी घटना आहे.

पोलीस भरतीदरम्यान चौथ्या तरूणाचा मृत्यू
>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १४ - पोलीस भरतीदरम्यान जखमी झालेल्या आणखी एका तरूणाचा मृत्यू झाला असून गेल्या आठवड्याभरातील ही चौथी घटना आहे. राहुल सपकाळ असे या तरूणाचे नाव असून पोलीस भरतीदरम्यान पळण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेला राहुल उन्हामुळे चक्कर येऊन पडला होता. त्याच्यावर फोर्टीस रुग्णालयात तीन दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र अखेर शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वी मालेगावहून मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेला अंबादास सोनावणे हा तरूण विक्रोळीतील चाचणीदरम्यान बेसुद्ध पडला होता, त्याचा सायन हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता. तर ठाणे ग्रामीण पोलिस भरतीसाठी आलेल्या साईप्रसाद माळी याला भरतीदरम्यान चक्कर आली. त्याला वाशीतील रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याचा मृत्यू झाला. आणि विशाल केदारे हा विक्रोळीत चाचणी देताना बेशुद्ध पडला - मुलुंडच्या प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला होता.