चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे चाकणहून अपहरण
By Admin | Updated: January 16, 2017 21:06 IST2017-01-16T21:06:46+5:302017-01-16T21:06:46+5:30
१४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी मुलावर चाकण पोलीस ठाण्यात

चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे चाकणहून अपहरण
ऑनलाइन लोकमत
चाकण,दि.16 - येथून १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अनोळखी मुलावर चाकण पोलीस ठाण्यात कलम ३६३ अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी रोजी संक्रातीच्या दिवशी अल्पवयीन मुलगी हि चुलते लालसिंग यांच्याकडे संक्रांतीचा फराळ घेऊन गेली होती. यावेळी त्यांच्या शेजारी राहणारे सुरेश थापा यांच्याकडे राहण्यास आलेल्या अनोळखी मुलाने मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेले आहे. गगन महावीर डोली ( वय ३६, रा. चंदूकाका सराफ ज्वेलर्स, मार्केटयार्ड जवळ, चाकण, मूळ रा. नेपाळ ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या अनोळखी मुलावर चाकण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र मोरे हे अधिक तपास करीत आहेत.