विदर्भात चौदाशे शिक्षक अतिरिक्त !

By Admin | Updated: June 30, 2016 00:08 IST2016-06-30T00:08:46+5:302016-06-30T00:08:46+5:30

बाराशे शिक्षकांची पदे रिक्त, ऑनलाइन संच मानत्येनंतरची आकडेवारी.

Fourteen teachers in Vidarbha extra! | विदर्भात चौदाशे शिक्षक अतिरिक्त !

विदर्भात चौदाशे शिक्षक अतिरिक्त !

सचिन राऊत/ अकोला
राज्यातील माध्यमिक शाळांची ऑनलाइन संच मान्यता नुकतीच झाली असून, यामध्ये विदर्भातील ११ जिल्हय़ांतील माध्यमिक शाळांमध्ये तब्बल १ हजार ३९८ शिक्षक अतिरिक्त असल्याचे आकडेवारीमध्ये समोर आले आहे. तर याच ११ जिल्हय़ात १ हजार २१६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन केल्यानंतरही सुमारे १८२ शिक्षक अतिरिक्तच ठरत असल्याचे संच मान्यतेनंतर उघड झाले आहे.
पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे राज्यातील माध्यमिक शाळांची शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर ऑनलाइन संच मान्यता घेण्यात आली. या संच मान्यतेमध्ये विदर्भातील ११ जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्ये तब्बल १ हजार ३९८ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. माध्यमिक शाळांमध्ये तब्बल १ हजार २१५ शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. मात्र शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेमुळे रिक्त पदे भरण्यास अडचणी येत असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने समायोजनाची प्रक्रिया तातडीने राबवून अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर समायोजन करण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

तरीही १८२ शिक्षक अतिरिक्त
विदर्भातील ११ जिल्हय़ांमधील रिक्त असलेल्या १ हजार २१६ जागांवर १ हजार ३९८ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केल्यानंतरही या ११ जिल्हय़ांतील १८२ शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. अतिरिक्त शिक्षकांना रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी गत दोन वर्षांपासून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, त्यानंतरही विदर्भातील शिक्षकांचे समायोजन अद्याप झालेले नसून, रिक्त पदे भरण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत.

जिल्हा             रिक्त पदं                 अतिरिक्त शिक्षक
अमरावती           ३0६                         १९५
अकोला                ७९                            २९
बुलडाणा              १२२                         १२९
वाशिम                २0६                           ५५
यवतमाळ            २00                         १९४
नागपूर                  ५५                         १९२
भंडारा                    ६४                           २९
गोंदिया                  ६४                            ७३
वर्धा                      ५५                          १९२
चंद्रपूर ३३ ४0
गडचिरोली ३२ २७0

Web Title: Fourteen teachers in Vidarbha extra!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.