इसिसच्या संपर्कातील चार तरुण एटीएसच्या जाळ्यात
By Admin | Updated: May 25, 2016 16:32 IST2016-05-25T16:32:18+5:302016-05-25T16:32:18+5:30
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या चार जणांना ताब्यात घेतले आहे.

इसिसच्या संपर्कातील चार तरुण एटीएसच्या जाळ्यात
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ - दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने इसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारी सकाळी दोन जणांना ताब्यात घेतले.
त्यांनतर आणखी दोघांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. याबाबतचा तपशील उपलब्ध होऊ शकला नसला तरी चार जणांना ताब्यात घेण्यात आल्याच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.