पालघरजवळ भीषण अपघातात ४ महिला ठार
By Admin | Updated: June 8, 2015 16:23 IST2015-06-08T16:23:32+5:302015-06-08T16:23:32+5:30
पालघरजवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे एक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार महिला ठार झाल्या आहेत.

पालघरजवळ भीषण अपघातात ४ महिला ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - पालघरजवळ मुंबई- अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे एक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार महिला ठार झाल्या आहेत. महामार्गावरील गुंदावे गावाजऴल रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रेतीच्या ट्रकला एका कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. गर्भवती महिलेला रुग्णालयात नेत असताना ही दुर्दैवी घटना घडली.