छपरा एक्सप्रेसच्या धडकेत चार महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: January 20, 2015 16:37 IST2015-01-20T16:24:44+5:302015-01-20T16:37:15+5:30
मध्य रेल्वेवरील आसनगाव स्टेशनजवळ छपरा एक्सप्रेसखाली सापडून चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

छपरा एक्सप्रेसच्या धडकेत चार महिलांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
आसनगाव (शहापूर), दि.२० - मध्य रेल्वेवरील आसनगाव स्टेशनजवळ छपरा एक्सप्रेसखाली सापडून चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेनंतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास आसनगाव स्टेशनवर कल्याणच्या दिशेने चार महिला रेल्वे रुळ ओलांडत होत्या. या दरम्यान तिथून येणा-या छपरा एक्सप्रेसने चौघींना उडवले. या भीषण अपघातात चौघींचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समजते. अपघातात आणखी एका पुरुषालाही एक्सप्रेसने धडक दिल्याचे वृत्त असले तरी या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.