पोलीस भरतीदरम्यान चार महिला उमेदवार जखमी
By Admin | Updated: April 28, 2017 03:43 IST2017-04-28T03:43:45+5:302017-04-28T03:43:45+5:30
पोलीस भरतीसाठी विक्रोळीत सुरू असलेल्या मैदानी चाचणीदरम्यान चार महिला उमेदवार चक्कर येऊन पडल्याने जखमी झाल्या

पोलीस भरतीदरम्यान चार महिला उमेदवार जखमी
मुंबई : पोलीस भरतीसाठी विक्रोळीत सुरू असलेल्या मैदानी चाचणीदरम्यान चार महिला उमेदवार चक्कर येऊन पडल्याने जखमी झाल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी विक्रोळीतील पूर्व द्रुतगती मार्गावर धावण्याच्या चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. चाचणी सुरू असताना अचानक चार महिला उमेदवार चक्कर येऊन खाली कोसळल्या. यात त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ मुलुंड पूर्वेकडील सावरकर रुग्णालयात पाठविण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी चार युवक पोलीस भरतीच्या वेळी ५ कि.मी. धावण्याची चाचणी देताना मरण पावले होते. त्यानंतर चाचणीतील धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्यात आले. तसेच मैदानी चाचणी दुपारी १२पर्यंत आणि सायंकाळी ४पासून घेण्याचे ठरले. त्यानंतरही प्रचंड उकाड्याचा फटका उमेदवारांना बसतच आहे. (प्रतिनिधी)