अजिंठा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, 5 गंभीर, 2 म्हशी ठार

By Admin | Updated: September 8, 2016 20:09 IST2016-09-08T20:09:36+5:302016-09-08T20:09:36+5:30

घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणा-या लोडींग रिक्षा व मोटार सायकल स्वारास जोराची धडक दिली.

Four vehicles of strange vehicles, 5 serious, 2 buffaloes killed in Ajantha Ghat | अजिंठा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, 5 गंभीर, 2 म्हशी ठार

अजिंठा घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, 5 गंभीर, 2 म्हशी ठार

ऑनलाइन लोकमत

अजिंठा, दि. 8 - घाटात भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटीबसने समोरून येणा-या लोडींग रिक्षा व मोटार सायकल स्वारास जोराची धडक दिली. तर बसच्या पाठीमागून येणारी व्हीस्टा कार बसला पाठीमागून धडकली. अशा चार वाहनांच्या िवचित्र अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. तर दोन म्हशी जागीच ठार झाल्या. हा अपघात गुरूवारी दुपारी 2 .30 वाजता अजिंठा घाटात झाला.

या अपघातात शिवाजी आत्मारा मुके, तात्याराव लक्ष्मण पाचिंगे, मानसा माणिकराव पाचिंगे, रा. अनाड ता. सिल्लोड, मोतीराम नामदेव ढाकरे रा. अजिंठा, निलाबाई निवडे रा. वसई हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर व्हीस्टा कार व एसटी मधील काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. ते उपचारा साठी आपापल्या गावी निघून गेले. त्यांची नावे मिळू शकली नाही. यावेळी अपघातग्रस्त एसटीत ५३ प्रवाशी होते.गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वैजापूर सिल्लोड बस क्र.एम.एच.२० बीएल २३९२ ही भरधाव वेगाने अजिंठा घाट उतरत असताना चालकाचा बस वरील नियंत्रण सुटले.

समोरून येणाऱ्या छोटा हत्ती लोडींग क्र. एम.एच.२० सीटी १९९३ ला धडक दिली. त्या मागे येत असलेली होंडा मोटारसायकल क्र. एम.एच.२० सीएन ३०७७ बसच्या चाकाखाली चिरडली गेली. यात छोटा हत्ती पलटी झाला. यातील दोन म्हेशी जागेवरच दबून ठार झाल्या. या चौरगी अपघातात शिवाजी मुके, तात्याराव पाचिंगे, मानसा पाचिंगे, मोतीलाल ढाकरे हे चार जण गंभीर रित्या जखमी झाले. तसेच मोटारसायकवरिल पांडुरंग निवडे यांनी चालत्या मोटारसायकलवर उडी मारल्याने तो बचावला. तर त्यांची आई
निलाबाई निवडे यांचा एक पाय तुटला त्या गंभीर जखमी झाल्या आहे.

अपघातानंतर एसटी बस चालकांनी धूम ठोकली. ग्रामीण रूग्णालयात जखमीवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद घाटीकडे पाठविण्यात आले.याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदण्याची प्रक्रीया उशीरा पर्यंत सुरू होती.

Web Title: Four vehicles of strange vehicles, 5 serious, 2 buffaloes killed in Ajantha Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.