चार हजार रु ग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरली आधार
By Admin | Updated: November 28, 2014 01:03 IST2014-11-28T01:03:04+5:302014-11-28T01:03:04+5:30
गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी

चार हजार रु ग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरली आधार
मेडिकलमध्ये सर्वात जास्त रुग्णांची नोंद
नागपूर : गोरगरिब रु ग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत वर्षभरात नागपुरातील ४ हजार १५४ रुग्णांना उपचार मिळाला आहे. यात कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही योजना खरी जीवनदायी ठरली आहे.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा दुसरा टप्पा २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात सुरू झाला. नागपूर जिल्ह्यात ही योजना तीन शासकीय रुग्णालयांसोबतच निवडक ३६ खासगी इस्पितळांमध्ये सुरू आहे. या योजनेत ९७२ आजारांवर उपचारासाठी सुरक्षेचे कवच दिले. मागील वर्षभरात एकट्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) या योजनेच्या केंद्रावरून ४ हजार १५४ जणांन उपचार घेतले. या रु ग्णांवर उपचाराच्या मोबदल्यात विमा कंपनीने आतापर्यंत ३ कोटी ३५ लाख रु पये दिले आहेत. याशिवाय अद्याप ५४ लाख रु पयांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बिलांमध्ये १०२ रु ग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, १३ लाख रुपयांची बिले विमा कंपनीने अगदीच क्षुल्लक कारणे देऊन प्रलंबित ठेवली आहे. या उपचाराचा फटका मेडिकलला बसला आहे. विमा कंपनी विविध कारणे देऊन बिले ना मंजूर करीत असल्याने याचा फटका आता रुग्णांनाही बसत आहे.
३ हजार ८२६ कर्करोगाच्या रुग्णांना लाभ
या योजनेत ३ हजार ८२६ कर्करोग रुग्णांनी मागील वर्षी उपचार घेतला. रेडिएशनच्या ३४९, अस्थिरोगाच्या१४६ , ट्रमाच्या ३३० यासह इतरही आजाराच्या रुग्णांनीही लाभ घेतला. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात १ हजार २४४ रुग्णांवर तर मेयोमध्ये ६१० रुग्णांवर उपचार करण्यात आले. वर्षभरात या तिन्ही शासकीय रुग्णालयांमध्ये ५ हजार ४६९ रुग्णांवर उपचार झाले. (प्रतिनिधी)