फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दहशतवाद्यांना अटक

By Admin | Updated: February 18, 2016 07:03 IST2016-02-18T07:03:11+5:302016-02-18T07:03:11+5:30

मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चौघांना गुप्तचर यंत्रणा,

Four terrorists arrested in Faraskhana blasts case | फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दहशतवाद्यांना अटक

फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणातील चार दहशतवाद्यांना अटक

पुणे : मध्य प्रदेशातील खांडवा कारागृहातून पसार झालेल्या तसेच पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांपैकी चौघांना गुप्तचर यंत्रणा, ओडिशा, तेलंगणा पोलिसांतर्फे ओडिशामधील संयुक्त कारवाईत पकडण्यात आले.
गेल्या वर्षी दोन दहशतवादी आंध्र प्रदेशात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाची (एटीएस) दोन पथके ओडिशा येथे रवाना झाली आहेत.
शेख मेहबूब ऊर्फ गुड्डू शेख ऊर्फ इस्माईल (३०), अमजद रमजान खान (३५), झाकीर हुसैन बद्रुल हुसैन ऊर्फ सादिक (३३) , मोहम्मद सलिक ऊर्फ सल्लू अब्दुल हकीम (३२) अशी त्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four terrorists arrested in Faraskhana blasts case