रॅगिंगप्रकरणी एमआयटीचे चार विद्यार्थी निलंबित

By Admin | Updated: January 1, 2015 02:36 IST2015-01-01T02:36:52+5:302015-01-01T02:36:52+5:30

टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे़

Four students of MIT suspended for ragging | रॅगिंगप्रकरणी एमआयटीचे चार विद्यार्थी निलंबित

रॅगिंगप्रकरणी एमआयटीचे चार विद्यार्थी निलंबित

पुणे : रॅगिंग प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांना एमआयटी प्रशासनाकडून पाठीशी घातले जात आहे, अशी टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याप्रकरणी जामिनावर सुटलेल्या तीन विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे़
अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी वर्गातीलच एका विद्यार्थ्यावर रॅगिंग केल्याची घटना सुमारे तीन महिन्यांपूर्वी उघडकीस आली होती़ या प्रकरणी कोथरूड पोलिसांत यश मिलन नाईक (१९), निखील भास्कर श्रीमल (२१), तेजस सतीश मिरजकर (२१) या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाला होता. सध्या हे विद्यार्थी जामिनावर होते. परंतु, महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई केली गेली नव्हती. परिणामी रॅगिंग झालेल्या पीडित विद्यार्थ्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यावर विद्यापीठाकडून महाविद्यालयास नोटीस पाठविण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे सुद्धा महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला जात होता. अखेर महाविद्यालयाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: Four students of MIT suspended for ragging