नाशिकमधील 9 वीत शिकणारे चार विद्यार्थी बेपत्ता

By Admin | Updated: July 13, 2017 22:50 IST2017-07-13T22:50:37+5:302017-07-13T22:50:37+5:30

मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता इग्लिश स्कूलचे इयत्ता 9 वीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शाळेत जातो असे सांगून...

Four students missing from 9th class in Nashik | नाशिकमधील 9 वीत शिकणारे चार विद्यार्थी बेपत्ता

नाशिकमधील 9 वीत शिकणारे चार विद्यार्थी बेपत्ता

>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - येथील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जनता इग्लिश स्कूलचे इयत्ता 9 वीमध्ये शिकणारे चार विद्यार्थी शाळेत जातो असे सांगून गेले ते अद्याप घरी परतले नसल्याने खळबळ उडाली आहे.  जनता स्कूलचे इयत्ता 9 वीत शिक्षण घेणारे दिपक कडाळे, कुलदीप सुनिल देशमुख, जिवन बल्हाळ, अमोल सुदाम चौधरी हे चार विद्यार्थी शाळेत जातो असे सांगून दिं.13 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बेपत्ता झाले आहे. 
 
सायंकाळी 5 वाजता शाळा सुटल्यानंतर मुले घरी परतली नाही. म्हणून पालकांनी शोधा -शोध सुरू केली असता चारही मुले बेपत्ता झाल्याचे उघड झाले. रात्री उशीरा दिंडोरी पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलीस शोध घेत आहेत. सदर मुले कुणाला दिसल्यास दिंडोरी पोलिस स्टेशन येथे ०२५५७-२२१०३३ या क्रंमाकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक मधूकर गावीत यांनी केले आहे.

Web Title: Four students missing from 9th class in Nashik