पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: June 10, 2017 18:28 IST2017-06-10T18:27:26+5:302017-06-10T18:28:13+5:30
पंढरपुरातील चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत 4 लहान मुलांचा बुडून मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 10 - पंढरपुरातील चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुट्टीचे दिवस असल्याने पंढरपूर शहरातील चार लहान मुलं चंद्रभागा नदीवरील घाटाजवळ पाण्यात पोहोण्यसाठी गेले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली. मृत पावलेली ही मुलं वयोवर्षे 6 ते 8 या गटातील होती. दरम्यान, उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी चारही मुलांना मृत घोषित केले.
घटनेचे वृत्त समजताच शहरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार केले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
मृत पावलेल्या मुलांची नावे
धीरज अप्पा जुमाळे, (वय 8 वर्षे)
श्रीपाद सुनील शहापुरकार, (वय 6 वर्षे)
गणेश सिद्धप्पा जुमाळे, (वय 8 वर्षे)
सौरभ अनिल शहापुरकार, (वय 6 वर्षे)