लाचखोर पीएसआयसह चार पोलिस निलंबित

By Admin | Updated: July 9, 2014 00:23 IST2014-07-09T00:23:51+5:302014-07-09T00:23:51+5:30

ट्रकचालकांकडून लाच मागणार्‍या महामार्गावरील बाळापूर ट्राफिक पॉइंटच्या पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस शिपायांना निलंबित करण्यात आले.

Four policemen suspended with bribery PSI | लाचखोर पीएसआयसह चार पोलिस निलंबित

लाचखोर पीएसआयसह चार पोलिस निलंबित

अकोला: पासिंग शुल्काच्या नावाखाली ट्रकचालकांकडून लाच मागणार्‍या महामार्गावरील बाळापूर ट्राफिक पॉइंटच्या पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस शिपायांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (महामार्ग) सुरेंद्र यांच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले. ३ जुलै रोजी रात्रीच्यावेळी तीन ट्रक बाळापूरजवळील ट्रॅफिक पॉइंटवर पोलिस उपनिरीक्षक सुभाष बावस्कर, पोलिस शिपाई गजानन चांभारे, मोहम्मद रफिक रऊफ शेख, सुमेरसिंह राजपूत, मोहन वानखडे यांनी अडविले आणि ट्रक सोडण्यासाठी ३३00 रुपयांची मागणी केली. होती. एसीबीचे पोलिस उपअधीक्षक उत्तम जाधव यांनी कारवाई करून लाचखोर पीएसआय व चारही पोलिस शिपायांना ४ जुलै रोजी अटक केली होती.

Web Title: Four policemen suspended with bribery PSI