मिल मालकासह चौघांना अटक
By Admin | Updated: February 1, 2017 05:42 IST2017-02-01T05:42:05+5:302017-02-01T05:42:05+5:30
येथील कीर्ती आॅइल मिलमध्ये सोमवारी रात्री वेस्टेज सेटलमेंट टँक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मिलच्या मालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली.

मिल मालकासह चौघांना अटक
लातूर : येथील कीर्ती आॅइल मिलमध्ये सोमवारी रात्री वेस्टेज सेटलमेंट टँक स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी मिलच्या मालकासह चौघांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सोमवारी दुपारी चार वाजता वेस्टेज सेटलमेंट टँकची स्वच्छता सुरू झाली. त्यानंतर, टँकमध्ये उतरलेल्या
नरेंद्र टेकाळे, दगडू पवार, बळीराम पवार, रामेश्वर शिंदे, राम येरमे, मारोती गायकवाड, शिवाजी अतकरे, आकाश भुसे, परमेश्वर बिराजदार या नऊ कामगारांचा गुदमरून
मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
- मिलचे मालक कीर्तीकुमार भुतडा, एकनाथ केसरे, मनोज क्षीरसागर, अंगद गायकवाड, मृत ठेकेदार राम येरमे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.