गिरगाव चौपाटीवर पोहण्यासाठी आलेले चार जण बुडाले, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 07:54 IST2017-04-08T07:44:22+5:302017-04-08T07:54:30+5:30
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पोहायला गेलेले चार जण बुडाल्याची घटना घडली आहे.

गिरगाव चौपाटीवर पोहण्यासाठी आलेले चार जण बुडाले, एकाचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पोहायला गेलेले चार जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले असून एका मृतदेह सापडला आहे. तर आणखी एक जण अजूनही बेपत्ता आहे.
मुंबईच्या धारावी परिसरातील चार मित्र गिरगाव चौपाटीवर गेले होते. पोहण्यासाठी समुद्रात ते उतरले, मात्र त्याच वेळी समुद्राला ओहोटी आल्यानं चारही जण आत ओढले गेले.
स्थानिक मच्छिमारांच्या बाब लक्षात आली. त्यांनी तातडीनं समुद्रातून दोघांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वतीनं शोध मोहीम सुरू करण्यात आल्यानंतर एकाचा मृतदेह सापडला.