नाशिकमध्ये कार झाडावर आदळून चार ठार
By Admin | Updated: June 2, 2017 13:52 IST2017-06-02T13:52:14+5:302017-06-02T13:52:14+5:30
वडाच्या झाडावर टाटा व्हेंचर ही चारचाकी आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

नाशिकमध्ये कार झाडावर आदळून चार ठार
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 2 - दिंडोरीरोडवरील मेटाफोर्स कंपनी रस्त्यासमोर असलेल्या वडाच्या झाडावर टाटा व्हेंचर ही चारचाकी आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
अपघातात ठार झालेले सर्व जण राजस्थान येथील रहिवासी आहेत. अपघातात २ पुरूष व २ महिलांचा समावेश आहे. पहाटे सहा वाजता हा अपघात घडला.