शिर्डीत ड्रेनेज चेंबर मधे पडून ४ जण ठार

By Admin | Updated: June 24, 2016 12:24 IST2016-06-24T12:24:08+5:302016-06-24T12:24:28+5:30

शिर्डीमध्ये नगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन मधून शेतीसाठी पाईप टाकून पाणी उचलताना हॉटेल सन अँड सँड जवळ ड्रेनेज चेंबरमध्ये पडून ४ जण ठार झाले.

Four people died in Shirdi Drainage Chamber | शिर्डीत ड्रेनेज चेंबर मधे पडून ४ जण ठार

शिर्डीत ड्रेनेज चेंबर मधे पडून ४ जण ठार

>ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. २४ -   शिर्डीमध्ये नगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन मधून शेतीसाठी पाईप टाकून पाणी उचलताना हॉटेल सन अँड सँड जवळ ड्रेनेज चेंबरमध्ये पडून ४ जण ठार झाले. सर्व मृत हे शेतकरी असून चेंबर मधील अडकलेला कचरा काढण्यासाठी ते आत उतरल्याचे समजते. हा चेंबर नऊ फूट खोल असून एकमेकांना वाचवताना चार जण यात बुडाले. तीन जेसिबी यंत्राच्या मदतीने पाणी अडवून व चेंबर फोडून या सर्वाना काढण्यात येत आहे,पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. यात प्राथमिक माहितीनुसार मृता मध्ये शिंदे,शेळके,मोरे व मिंधार यांचा समावेश आहे

Web Title: Four people died in Shirdi Drainage Chamber