नाशिकच्या चार अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: June 19, 2017 01:27 IST2017-06-19T01:27:44+5:302017-06-19T01:27:44+5:30

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले.

Four minor girls from Nashik are in police custody | नाशिकच्या चार अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात

नाशिकच्या चार अल्पवयीन मुली पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट (जि. अकोला) : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुलींना शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. यासंदर्भात येथील एका महिलेची चौकशी पोलीस करीत आहेत.
अकोट शहर पोलिसांनी काही भागांत राबविलेल्या शोधमोहिमेदरम्यान अमिनपुरा येथे रशिदाबी हिच्या घरी बाहेरगावच्या चार ते पाच अल्पवयीन मुली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता ५ ते १२ वर्षे या वयोगटातील चार मुली रशिदाबी हिच्या घरी आढळल्या.
या मुलींची अधिक चौकशी केली असता त्या मालेगाव (जि. नाशिक) येथून आल्या असल्याचे समजले. शहानिशा करण्याकरिता अकोट शहर पोलिसांनी संपर्क साधला असता मालेगाव पोलीस ठाण्यात या चार अल्पवयीन मुली बेपत्ता असल्याची नोंद दाखल असल्याचे स्पष्ट झाले. मालेगाव पोलिसांचे पथक मुलींना ताब्यात घेण्याकरिता येत असल्याचे ठाणेदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले.

Web Title: Four minor girls from Nashik are in police custody