माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 12:48 PM2024-01-21T12:48:02+5:302024-01-21T12:49:07+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.

Four ministers set a trap against me, I will announce the name says Manoj Jarange Patal | माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. काल शनिवारी मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. हा मोर्चा पायी मुंबईपर्यंत जाणार आहे. २६ जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसणार आहेत."मी मरायला भीत नाही, आरक्षणाशिवाय मागे हटणार नाही, माझ्याविरोधात राज्यातील चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला.

"मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी राज्यातील करोडो मराठा रस्त्यावर येतील, २५ जानेवारीला आंदोलनाची पुढची दिश ठरवणार आहे. या आंदोलनाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. मला मुंबईत काही झाले तर वर्षानुवर्ष हे आंदोलन सुरू होईल. सरकारमधील चार-पाच मंत्री आमच्याविरोधात ट्रॅप लावत आहेत. त्यांनी काही केलं तर लगेच मी नाव जाहीर करणार आहे, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

"अंतरवली सराटी सारखी चूक त्यांनी करु नये. ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असेल. त्यांना पश्चाताप करायला वेळ मिळणार नाही. त्यांनी आरक्षणात तोडगा काढण्यातच काम करायला पाहिजे. आता पूर्वीचा मराठा राहिलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा आहेत. आम्ही त्यांना वेळ दिला आहे. मुख्यमंत्री शिंदे, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे त्यांनी लक्ष घालून आरक्षण द्या. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. बाकीचे प्रयत्न करायला गेलात तर त्याचे परिणाम वाईट होणार होतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.  

"मराठा समाजातील मुल मोठी झाली पाहिजेत. तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्या. सरकारने मला काही त्रास दिला तर तुम्ही सर्वजण माझ्या मागे या. मला अंतरवलीत मराठा समाजात मला काही झालं तर वर्षानुवर्षे हे आंदोलन सुरू ठेवण्याचा शब्द दिला आहे, असंही जरांगे पाटलांनी सांगितलं. 

Web Title: Four ministers set a trap against me, I will announce the name says Manoj Jarange Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.