नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
By Admin | Updated: June 18, 2017 12:21 IST2017-06-18T11:11:27+5:302017-06-18T12:21:28+5:30
शेवगाव या तालुक्याच्या शहरात विद्यानगर परिसरात पती,पत्नी व त्यांच्या दोन मुलांची हत्त्या करण्यात आली आहे.

नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 18 - शेवगाव या तालुक्याच्या शहरात विद्यानगर परिसरात पती,पत्नी व त्यांच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री घडलेली ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
आप्पासाहेब गोविंद हरवणे (वय 58), त्यांची पत्नी सुनंदा (48),मुलगी स्नेहल (18)व मुलगा मकरंद (15) यांची हत्या झाली आहे. आप्पासाहेब हे लष्करी सेवेत होते. निव्रुत्तीनंतर ते भूमी अभिलेख विभागात चौकीदार म्हणून काम करत होते. हे हत्याकांड का घडवण्यात आले हे समजू शकलेले नाही. सकाळी दूधवाला आला तेव्हा हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, चाकूने भोसकून या चौघांचीही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.