नाशिक अपघातात चौघे ठार

By Admin | Updated: June 3, 2017 03:50 IST2017-06-03T03:50:20+5:302017-06-03T03:50:20+5:30

म्हसरूळ शिवारात दिंडोरी रोडवरील मेटा फोर्स कंपनीसमोर वडाच्या झाडावर कार आदळून शुक्रवारी पहाटे राजस्थानमधील

Four killed in Nashik crash | नाशिक अपघातात चौघे ठार

नाशिक अपघातात चौघे ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : म्हसरूळ शिवारात दिंडोरी रोडवरील मेटा फोर्स कंपनीसमोर वडाच्या झाडावर कार आदळून शुक्रवारी पहाटे राजस्थानमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश असून, अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजस्थानच्या साकेत जिल्ह्यातील शिखर येथील रहिवासी रामअवतार सुरजसिंग कुमावत (५२), गुडिया रामअवतार कुमावत (१५), चालक मनोहर दुर्गाराम जांगिड (५७), संतोषदेवी मनोहर जांगिड (५२) व संतोषी रामअवतार कुमावत (५१) असे सर्व जण टाटा व्हेंचर कारने दिंडोरी रस्त्याने नाशिककडे येत होते़

शिर्डीला जाण्यापूर्वीच अपघात
सुरतला देवदर्शन केल्यानंतर जांगिड कुटुंबीय नाशिकला निघाले होते़ या सर्वांना शिर्डी येथील साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी जायचे होते़ मात्र, तत्पूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

Web Title: Four killed in Nashik crash