नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार

By Admin | Updated: February 7, 2016 12:26 IST2016-02-07T12:18:18+5:302016-02-07T12:26:38+5:30

नागपूर शहरातील खापरी येथे एका चारचाकी गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला.

Four killed in Nagpur accident at Khapri | नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार

नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. ७ -  नागपूर शहरातील खापरी येथे एका चारचाकी गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. चारही मृत एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. 
 
हे कुटुंब बुटीबोरीहून नागपूरच्या दिशेने येत असताना खापरी जवळ चालकाचे स्टेअरींगवरील नियंत्रण सुटले आणि गाडी ट्रकला जाऊन धडकली. 
 
ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण जखमी झाला असून, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Four killed in Nagpur accident at Khapri