कोल्हापूरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, अपघातात ४ ठार
By Admin | Updated: February 6, 2015 12:19 IST2015-02-06T09:13:51+5:302015-02-06T12:19:30+5:30
देवदर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या कारला ट्रकने धडक बसून झालेल्या अपघातात वसई-विरारमधील चार जभाविक ठार झाले आहेत.

कोल्हापूरमध्ये भाविकांवर काळाचा घाला, अपघातात ४ ठार
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ६ - देवदर्शनासाठी जाणा-या भाविकांच्या कारला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण ठार झाले असून ७ जण जखमी झाले आहेत. कोल्हापूरजवळील कागल येथे शुक्रवारी हा भीषण अपघात झाला असून सर्व प्रवासी वसई- विरार परिसरातील आहेत.
कोल्हापूरमार्गे कर्नाटकला निघालेल्या भाविकांच्या क्वालिस गाडीला मागून भारधाव वेगाने येणा-या ट्रकने जोरदार धडक दिली. त्याच चार जण ठार झाले असून सात जण जखमी आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.