केदारनाथ यात्रेत चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 7, 2017 05:09 IST2017-05-07T05:09:30+5:302017-05-07T05:09:30+5:30
महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील यात्रेकरूंना घेऊन गंगोत्रीहून केदारनाथकडे जाणारी एक मॅटॅडोर व्हॅन शनिवारी उत्तराखंडच्या

केदारनाथ यात्रेत चौघांचा मृत्यू
न्यू टेहरी : महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील यात्रेकरूंना घेऊन गंगोत्रीहून केदारनाथकडे जाणारी एक मॅटॅडोर व्हॅन शनिवारी उत्तराखंडच्या टेहरी जिल्ह्यात खोल दरीत कोसळून चौघांचा मृत्यू झाला.
टेहरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एन. एस. नापालचाल यांनी सांगितले की, चांगौरा येथे झालेल्या या अपघातात मॅटोडोरच्या चालकासह आणखी सहाजण जखमी झाले असून त्यांना इस्पितळात दाखल केले गेले आहे. पोलिसांनी
मृतांची नावे चंद्रकांत काळकर (६१), त्यांच्या पत्नी कुंदा काळकर (५०), मीनाताई (४८) आणि संजय पटिओ (५७)
अशी दिली. जखमींमध्ये पूनादेवी (५), सुधाकर मुरारी (५५), सतीश (५७), वासुदेव राऊत (४५), अर्चना (५१), आर्य (१५) आणि ड्रायव्हर शहनाझ (२५) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)