कार-ट्रक अपघातात चार ठार

By Admin | Updated: December 28, 2014 01:31 IST2014-12-28T01:31:43+5:302014-12-28T01:31:43+5:30

तीनचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना भरधाव ट्रक समोरुन येणाऱ्या कारला धडकून झालेल्या भीषण अपघातात चौघे जण ठार झाले.

Four killed in car-truck crash | कार-ट्रक अपघातात चार ठार

कार-ट्रक अपघातात चार ठार

मिरजगाव (जि. अहमदनगर) : तीनचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना भरधाव ट्रक समोरुन येणाऱ्या कारला धडकून झालेल्या भीषण अपघातात चौघे जण ठार झाले. तीनचाकी वाहनाच्या चालकाशिवाय कारमधील थोरात कुटुंबियातील तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा अपघात नगर-सोलापूर महामार्गावर कोकणगाव शिवारात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला़ चित्रा रमेश थोरात(४५), योगेश रमेश थोरात (२२), यश सुनिल थोरात (१०) आणि चालक सोमनाथ गुरुदास देशमुख (२०) यांचा समावेश आहे़
सोलापूरकडून येणारा ट्रक ओव्हरटेक करताना कारवर धडकला. यामध्ये तीनचाकी वाहन दूरवर फेकले गेले. या वाहनाचा चालक ाचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये बसलेले पाच ते सहा जण हे पाटबंधारे खात्यातील निवृत्त अधिकारी दिलीप थोरात यांचे कुटुंबिय होते. अपघातानंतर तीन वाहनांच्या जोराच्या धडकेचा मोठा आवाज झाला. त्यामुळे कोकणगावमधील नागरिक तातडीने मदतीला धावले. थोरात कुटुंबियातील तिघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिलीप थोरात हेही गंभीर असून, तीनचाकी वाहनातील प्रवाशी हे यात्रेकरू असल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: Four killed in car-truck crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.