मुंबई - गोवा हायवेवर अपघातात चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: April 13, 2016 11:17 IST2016-04-13T09:06:54+5:302016-04-13T11:17:10+5:30
मुंबई - गोवा हायवेवर कोलाडजवळ एसटीने रिक्षाला धडक दिली आहे, या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे

मुंबई - गोवा हायवेवर अपघातात चौघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत -
रायगड, दि. १३ - मुंबई - गोवा हायवेवर कोलाडजवळ एसटीने रिक्षाला धडक दिली आहे. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. एसटी बस चिपळूणहून मुंबईला जात असताना हा अपघात झाला आहे. एसटीने दिलेली धडक इतकी जोरदार होती की रिक्षामधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत पावलेले सर्वजण माणगावच्या खरवली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे हायवेवरच टेमपालेजवर एसटीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.