साक्रीजवळ बस-ट्रक अपघातात चार ठार ४८ प्रवासी जखमी
By Admin | Updated: July 8, 2016 22:32 IST2016-07-08T22:32:28+5:302016-07-08T22:32:28+5:30
शहरानजिकच्या शेवाळी फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एस.टी. बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार झाले तर ४८ प्रवासी जखमी झाले.

साक्रीजवळ बस-ट्रक अपघातात चार ठार ४८ प्रवासी जखमी
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. ८ : शहरानजिकच्या शेवाळी फाट्यानजीक शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास एस.टी. बस व कंटेनर यांची समोरासमोर धडक होऊन चार जण ठार झाले तर ४८ प्रवासी जखमी झाले. त्यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. मृतांमध्ये दोन बालकांचा व अनोळखी आदिवासी महिलेचा समावेश आहे. कंटेनर (टीएस ०८ युबी १९३९) धुळ्याकडून येत होता. तर बस धुळ्याकडे चालली होती. दोघांची समोरासमोर धडक झाली. त्यातील वाहक बाजूस बसलेले तीन प्रवासी जागीच ठार झाले.
त्यात फिरोज शकील शेख (वय ८), अफ्रिन जाकीर शेख (वय ४) व ३५ वर्ष वयाची एक अनोळखी आदिवासी महिलेचा समावेश आहे. परवीन शकील शेख (वय २५) रा.धुळे हीचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ४८ प्रवासी जखमी या अपघातात एस.टी. बसमधील ४८ प्रवासी जखमी झाले आहेत.