चार अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये
By Admin | Updated: September 11, 2014 03:32 IST2014-09-11T03:32:52+5:302014-09-11T03:32:52+5:30
राज्यातील चार अपक्ष आमदारांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे.

चार अपक्ष आमदार काँग्रेसमध्ये
मुंबई : राज्यातील चार अपक्ष आमदारांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानसभा निवडणुकीत पक्षातर्फे उमेदवारी दिली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीची हवा असल्याचे चित्र निर्माण केले जात असताना अपक्ष आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास प्राधान्य देत ‘पंजा’ हाती घेतल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. आणखी काही अपक्ष आमदार लवकरच पक्षात येण्याची शक्यता आहे.
वसंतराव चव्हाण (नायगाव, जि. नांदेड), सुरेश जेथलिया (परतूर, जि. जालना), शिरीष चौधरी (रावेर, जि. जळगाव) आणि जयकुमार गोरे (माण खटाव, जि. सातारा) या अपक्ष आमदारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आतापर्यंत ते काँग्रेसचे सहयोगी सदस्य होते. गांधी भवनात झालेल्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे
या चारही आमदारांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाईल, असे माणिकराव ठाकरे यांनी नंतर झालेल्या पत्रपरिषदेत स्पष्ट केले. या चारपैकी माण खटाव आणि नायगाव हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहेत. ते त्यांच्याकडून आम्ही घेऊ, असे ते म्हणाले. इतरही काही आमदार काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्या प्रवेशाचे कार्यक्रम संबंधित मतदारसंघांमध्ये होतील, असे त्यांनी सांगितले.
जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात. मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीचा (पान १० वर)