शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

रायगड रोपवेसाठी चार तासांची प्रतीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:00 IST

शिवप्रेमींची अलोट गर्दी; वाहन पार्किंगचा बिकट प्रश्न

महाड: किल्ले रायगडावर मंगळवारी शिवप्रेमींची गर्दी उसळली. यामुळे रायगड रोपवेला सुमारे चार-पाच तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाण्याला अनेकांनी पसंती दिली. रायगड पायथ्याशी वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न बिकट झाला. रायगड रोपवे ते रोपवे फाटा, रोपवे फाटा ते चित्त दरवाजापर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 

रायगड किल्ला, राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ असलेल्या पाचाड परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शिवप्रेमी मोठ्या संख्येने गडावर येत आहेत. त्यामुळे पाचाडपासून वाहनांच्या रांगा लागल्या असून, चित्तदरवाजा येथे वाहने पार्किंग करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड रोपवेला सुमारे चार तासांची प्रतीक्षा असल्याने पायी जाणाऱ्यांची संख्यादेखील वाढली. यामुळे चित्त दरवाजा येथे पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे चित्त दरवाजा या ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठा फटका बसत आहे.

रायगडाचा आणि परिसराचा विकास झपाट्याने होत असला तरी शासनाचे मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष आहे. या ठिकाणी संपादित जागेत किंवा टी पॉइंटजवळ वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. यामुळे शिवप्रेमींची गैरसोय होणार नाही, स्थानिक व्यावसायिक सिराज सय्यद म्हणाले.

रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा फटकामहाड-रायगड मार्गाचे रुंदीकरण झाले असले तरी पाचाड रोपवे फाटा ते चित्त दरवाजापपर्यंतचा मार्ग अद्याप अरुंद आहे. यामुळे या ठिकाणी दुतर्फा वाहने उभी करण्यात येतात. चित्त दरवाजा या ३ ठिकाणी वाहतूककोंडी होत असल्याने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसदेखील अडकून पडत आहेत. याचा फटका ग्रामस्थांना बसत असून, अनेकवेळा पायी चालत जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र