विदर्भातील चार पालकमंत्री बदलले

By Admin | Updated: July 31, 2014 04:02 IST2014-07-31T04:02:19+5:302014-07-31T04:02:19+5:30

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विदर्भातील चार पालकमंत्र्यांची अदलाबदल केली.

Four Guardian ministers of Vidarbha changed | विदर्भातील चार पालकमंत्री बदलले

विदर्भातील चार पालकमंत्री बदलले

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विदर्भातील चार पालकमंत्र्यांची अदलाबदल केली. रोहयो मंत्री नितीन राऊत यांना नागपूर,तर राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद दिले. दहा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपले कट्टर समर्थक मुळक यांची नागपूरच्या पालकमंत्रीपदी नेमणूक केली होती, पण त्यावर पक्षांतर्गत तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने त्या निर्णयाला त्याच दिवशी स्थगिती द्यावी लागली होती.
आजच्या निर्णयानुसार नागपूरचे पालकमंत्रीपद राऊत यांना देताना मुळक यांना भंडाऱ्याला पाठविण्यात आले. मुळक विधान परिषदेचे सदस्य आहेत, तर राऊत हे उत्तर नागपुरातून विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांना यवतमाळ तर सार्वजनिक बांधकाम राज्य मंत्री रणजित कांबळे यांना वर्धा या त्यांच्या गृह जिल्'ाचे पालकमंत्रीपद देण्यात आले. मुळक वगळता इतर तिघांना गृहजिल्हा मिळाला आणि ‘घर की मुर्गी...’या न्यायाने की काय मुळक यांना पुन्हा एकदा जिल्'ाबाहेर जावे लागले. आधी ते वर्धेचे पालकमंत्री होते. ते पश्चिम नागपुरातून विधानसभेची निवडणूक लढवू इच्छितात. त्यांचे तिकिट आणखी पक्के व्हावे यासाठी दहा दिवसांपूर्वी त्यांना नागपूर देण्यात आले होते, पण राऊत यांच्या विरोधामुळे तो निर्णय मागे घ्यावा लागला, अशी चर्चा आहे.
स्थानिक मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्याऐवजी बाहेरच्या जिल्'ातील मंत्र्याला ते दिले की पक्षांतर्गत गटबाजीला आळा बसेल असे गृहित धरून विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळापासून बाहेरून पालकमंत्री लादले गेले. त्यामुळे बाहेरून आलेल्या मंत्र्यांना त्या जिल्'ाच्या समस्या समजत नाहीत, असे आरोप झाले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज आज खूप उशिराने का होईना पण तीन मंत्र्यांना गृहजिल्'ात पाठविले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Four Guardian ministers of Vidarbha changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.