सोलापूरमध्ये चार मुलींचा बुडून मृत्यू
By Admin | Updated: February 22, 2015 01:34 IST2015-02-22T01:34:37+5:302015-02-22T01:34:37+5:30
बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

सोलापूरमध्ये चार मुलींचा बुडून मृत्यू
बार्शी (सोलापूर) : बार्शी-कुर्डूवाडी रोडवरील अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार शाळकरी मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
स्नेहल नाना कसबे (१४), अश्विनी हरिश्चंद्र खंडागळे (१४), दीपाली तानाजी वाघमारे (१४), आणि मोहिनी चंद्रकांत सुपेकर (१३) या शाळा सुटल्यानंतर अलिपूर ओढ्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. सध्या ज्वारी काढणीचे दिवस असल्याने या सर्व मुलींचे आई-वडील दुसऱ्याच्या शेतात ज्वारी काढणे व मोडणे या कामासाठी गेले होते; ही संधी त्यांनी साधली. या पाण्याची खोली साधारण १० ते १५ फूट होती. म्हशी चारण्यासाठी तेथे आलेल्या कुमार सोपान वाघमारे याला एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्याने आरडाओरड करून लोक गोळा केले. या चौघींपैकी स्नेहल, दीपाली व मोहिनी या अॅड. दिलीप सोपल विद्यालय चव्हाण प्लॉट, बार्शी येथे आठवीत तर अश्विनी खंडागळे ही संत ज्ञानेश्वर विद्यालय ज्ञानेश्वर मठ येथे सातवीत शिकत होती.