एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

By Admin | Updated: June 19, 2017 01:41 IST2017-06-19T01:41:53+5:302017-06-19T01:41:53+5:30

एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी येथे उघडकीस आली़ हत्येचे नेमके कारण समजलेले नाही़ अप्पासाहेब गोविंद हरवणे

Four of the family members were killed | एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव (अहमदनगर) : एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी येथे उघडकीस आली़ हत्येचे नेमके कारण समजलेले नाही़ अप्पासाहेब गोविंद हरवणे (५८), त्यांची पत्नी सुनंदा (४८), मुलगी स्नेहल (१८) व मुलगा मकरंद (१५) यांचा निर्घृण खून करण्यात आला.
अप्पासाहेब हे निवृत्त सैनिक होते. शेवगावच्या भूमिअभिलेख कार्यालयात ते कार्यरत होते. रविवारी सकाळी दूधवाला आल्यानंतर, घर बंद असल्याने त्याने शेजारील कुटुंबाकडे चौकशी केली. त्यानंतर, एक जण छतावरून घरात गेल्यानंतर अप्पासाहेब यांचा मृतदेह हॉलमध्ये पलंगावर, तसेच मोकळ्या जागेत इतरांचे मृतदेह आढळले. घराच्या बाहेर दरवाजाजवळ एक प्लॅस्टिक हॅँडग्लोज व टॉवेल आढळून आला.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे़ पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे़ काही जणांची चौकशी सुरू आहे़

Web Title: Four of the family members were killed