पंढरपूरमध्ये घराचं छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार
By Admin | Updated: October 10, 2016 10:13 IST2016-10-10T09:53:30+5:302016-10-10T10:13:19+5:30
घराचे छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना पंढरपूरमधील मुंढेवाडी येथे घडली.
पंढरपूरमध्ये घराचं छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघे ठार
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १० - घराचे (मातीचे) छत कोसळून एकाच कुटुंबातील चौघेजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर तालुक्यातील मुंढेवाडी गावात घडली. मृतांमध्ये पती-पत्नीसह मुलगा व मुलीचाही समावेश असून मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
बशीर हुसैन शेख( वय 27), नफीसा बशीर शेख( वय 22) साहिल बशीर शेख(वय 8) आणि आलिशा बशीर शेख (वय 6) अशी मृतांची नावे असून गाढ झोपेत असतानाचा मृत्यूने त्यांच्यावर घाला घातला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.