महावितरणमध्ये चार कार्यकारी संचालक
By Admin | Updated: October 7, 2015 03:55 IST2015-10-07T03:55:10+5:302015-10-07T03:55:10+5:30
महावितरणमध्ये चार नवीन कार्यकारी संचालकांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबई मुख्यालयातील वीज खरेदी विभागाचे मुख्य अभियंता

महावितरणमध्ये चार कार्यकारी संचालक
मुंबई : महावितरणमध्ये चार नवीन कार्यकारी संचालकांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबई मुख्यालयातील वीज खरेदी विभागाचे मुख्य अभियंता अशोक चव्हाण यांची कार्यकारी संचालक (वाणिज्य व वितरण-१) या पदावर निवड करण्यात आली आहे. तर कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर येरमे यांची कार्यकारी संचालक (वितरण व प्रकल्प-४), अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय ताकसांडे यांची कार्यकारी संचालक (वितरण-२) आणि मुंबई मुख्यालयातील पायाभूत आराखडा विभागाचे मुख्य अभियंता दिनेशचंद्र साबू यांची कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा व वितरण-३) म्हणून निवड झाली आहे.