उजनीच्या बॅकवाटरमध्ये चार डॉक्टर बुडाले
By Admin | Updated: May 1, 2017 04:50 IST2017-05-01T04:50:18+5:302017-05-01T04:50:26+5:30
सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेले चार डॉक्टर उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे.

उजनीच्या बॅकवाटरमध्ये चार डॉक्टर बुडाले
इंदापूर : सुट्टीनिमित्त गावी फिरायला आलेले चार डॉक्टर उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये बुडाल्याची घटना घडली आहे. बोटीतून १० डॉक्टर प्रवास करत होते. उर्वरित सहा जण पोहून सुखरुप बाहेर आले.
इंदापूर तालुक्यातील अजोती गावातील ही घटना आहे. बुडालेल्या चार जणांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे.
डॉ. सुभाष मांजरेकर (अकलूज), डॉ.महेश लवटे (नातेपुते), डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. उराडे (नातपुते) या चौघांचा मृतांमध्ये समावेश आहेक. डॉ. उराडे यांचा मृतदेह मिळाला आहे.
डॉ. प्रवीण श्रीरंग पाटील (माळशिरस), डॉ. दत्तात्रय भगवान सर्चे (माळशिरस), डॉ. अतुल विनोदकुमार दोशी (अकलूज), डॉ. श्रीकांत नंदकुमार देवडेकर (अकलूज), डॉ. समीर अशोक दोशी (अकलूज), डॉ. दिलीप तुळशीराम वाघमोडे (माळशिरस) या सहा डॉक्टरांना पाण्यातून बाहेर पडण्यात यश आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)