राज्यात चार कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
By Admin | Updated: December 16, 2014 03:17 IST2014-12-16T03:17:07+5:302014-12-16T03:17:07+5:30
सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून विदर्भात दोन व खान्देशात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपविली़ गेल्या दोन दिवसांत खान्देशात आत्महत्या

राज्यात चार कर्जबाजारी शेतकऱ्यांची आत्महत्या
नम्रता फडणीस , पुणे
साधारणपणे डिसेंबर-जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाबाबत अद्याप कोणतीच घोषणा न झाल्याने साहित्य वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहेत. यंदा संमेलनाच्या तारखांचे नव्हेतर स्थळाच्या घोषणेचा मुहूर्तही बालकुमार साहित्य संस्थेला गवसलेला नाही. उलट संस्थेचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी परस्परविरोधी माहिती देऊन आयोजनाबाबत संभ्रम निर्माण केला आहे.
संमेलनाच्या आयोजनाच्या सोयीसाठी तीन महिने आधी बैठक घेऊन आलेली निमंत्रणे आणि तारखा यावर सविस्तर चर्चा होऊन त्याची घोषणा संबंधित आयोजक संस्थेकडून होणे अपेक्षित असते. मात्र बालकुमार साहित्य संस्थेने याबाबत कोणतीच बैठक घेतलेली नसल्याने संमेलनाचे आयोजन रखडल्याचे बोलले जात आहे.
गेल्यावर्षी पुण्यात बालकुमार संमेलन होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. यंदा एकीकडे बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष, संमेलनासाठी एकाही ठिकाणाहून निमंत्रण आले नसल्याचे सांगतात तर, दुसरीकडे यंदाच्या संमेलनासाठी तीन निमंत्रणे आली असल्याचे कार्याध्यक्षांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट
केले.
संमेलनाच्या आयोजनासाठी दौंड, बार्शी आणि कोल्हापूर आदी भागातून निमंत्रणे आली आहेत. त्या स्थळांच्या पाहणीदरम्यान काही व्यावहारिक अडचणी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे अजून स्थळ निवडीबाबत कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचता आलेले नाही. लवकरच यावर निर्णय होईल, असे संस्थेचे कार्याध्यक्ष नवीन इंदलकर यांनी सांगितले.