धुळ्यात भीषण अपघातात 4 ठार
By Admin | Updated: May 9, 2017 20:35 IST2017-05-09T20:35:44+5:302017-05-09T20:35:44+5:30
धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव सुमो कार उभ्या असलेल्या डंपरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर

धुळ्यात भीषण अपघातात 4 ठार
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 9 - धुळ्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर भरधाव सुमो कार उभ्या असलेल्या डंपरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर दहाहून अधिक जण जखमी झाले. हा अपघात आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर नवकार मोटर्सजवळ घडला.
आज संध्याकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर वेगाने जात असलेली सुमो (एमएच 19 क्यू 9689) रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरवर आदळली. या आपघाताची तीव्रता एवढी होती, की ज्यामुळे डंपरला ठोकर बसल्यानंतर सुमोच्या वरच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दरम्यान, या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे तर दहा हून अधिक जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.