चार दिवस भरतीचे...

By Admin | Updated: July 14, 2014 03:20 IST2014-07-14T03:20:31+5:302014-07-14T03:20:31+5:30

पावसाने आपला जोर कायम ठेवला असतानाच या आठवड्यातील सलग चार दिवस मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार आहे

Four days recruitment ... | चार दिवस भरतीचे...

चार दिवस भरतीचे...

मुंबई : पावसाने आपला जोर कायम ठेवला असतानाच या आठवड्यातील सलग चार दिवस मुंबईच्या समुद्राला मोठी भरती येणार आहे. भरतीदरम्यानच्या लाटांची उंची ५ मीटर एवढी असणार असून, समुद्र खवळलेला राहणार असल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा रविवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस गुजरात आणि राजस्थानच्या आणखी भागात पुढील दोन ते तीन दिवसांत दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. शिवाय वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या ओरिसा, पश्चिम बंगालच्या भागात आहे. समुद्रसपाटीवर गुजरात आणि केरळच्या किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
पाणी वाचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर!
भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करत महापालिका प्रशासनाने आता सोशल मीडियाद्वारेही पाणीबचतीचे आवाहन करण्याचा निर्णय घेतला आहे. एसएमएसद्वारेही पाणीबचतीचा संदेश देण्याचे ठरविले. तसेच व्हॉट्स अ‍ॅप आणि यूट्युबवरही पाणीबचतीचा संदेश देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Four days recruitment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.