एसटी चालकासह चार कंट्रोलरांविरुद्ध गुन्हा

By Admin | Updated: November 22, 2015 02:11 IST2015-11-22T02:11:07+5:302015-11-22T02:11:07+5:30

एका २३वर्षीय महिला बस वाहकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका एसटी चालकासह चार वाहतूक निरीक्षकांविरुद्ध (कंट्रोलर) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात

Four Controllers with ST Driver | एसटी चालकासह चार कंट्रोलरांविरुद्ध गुन्हा

एसटी चालकासह चार कंट्रोलरांविरुद्ध गुन्हा

श्रीरामपूर : एका २३वर्षीय महिला बस वाहकाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून एका एसटी चालकासह चार वाहतूक निरीक्षकांविरुद्ध (कंट्रोलर) श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीरामपूर बस आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या या पीडित महिलेने यापूर्वी सहायक पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह एसटी व पोलीस दलातील वरिष्ठांकडे निवेदन देऊन या प्रकरणास वाचा फोडली होती. याबाबत शुक्रवारी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर ओला यांच्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार बसचालक राजू अण्णासाहेब शरणागते तसेच वाहतूक निरीक्षक अन्सार शेख, पंढरीनाथ गाडे, आर.बी. शेळके व देवीदास कहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जण विविध कामगार संघटनांचे पुढारी आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Four Controllers with ST Driver