चार लाचखोरांना अटक

By Admin | Updated: August 22, 2014 01:31 IST2014-08-22T01:31:21+5:302014-08-22T01:31:21+5:30

मालमत्तेच्या दस्तऐवजातील नावात बदल करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालय परिसरातील उपनिबंधक कार्यालयाच्या सहायक

Four bribe arrests | चार लाचखोरांना अटक

चार लाचखोरांना अटक

लाचलुचपत विभागाची कारवाई : अमरावती व गोंदिया जिल्ह्यातील घटना
अचलपूर/गोेंदिया : मालमत्तेच्या दस्तऐवजातील नावात बदल करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालय परिसरातील उपनिबंधक कार्यालयाच्या सहायक उपनिबंधकासह स्टॅम्प वेंडर व त्याच्या सहकाऱ्याला गुरुवारी दुपारी १.३० वाजता लाचलुचपत विभागाने स्थानिक रंगेहाथ अटक केली. गोंदियया जिल्ह्यातील सालेकसा येथील एका फोटो स्टुडिओमध्ये गुरूवारी दुपारी १२ वाजता एक हजार रूपयांची मागणी करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास अटक करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यातील घटनेत मनीष सुखदेवराव लाडोळे (३०, रा. बिलनपुरा, अचलपूर) असे फिर्यादीचे नाव आहे. उपनिबंधक कार्यालयाचे सहायक उपनिबंधक रमेश आनंदराव उखळकर (५४), राजेंद्र अमृतराव वानखडे (४२, रा. अब्बासपुरा, अचलपूर) व स्टॅम्प वेंडर प्रेमचंद टेकचंद दंते (४८ रा. पोस्ट आॅफीसजवळ परतवाडा) असे प्लॉट खरेदीच्या नावात फेरबदल व सब डिव्हिजन करुन देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकरल्याप्रकरणी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मनीष लाडोळे यांचे परतवाडा शहरानजीकच्या खेलतपमाळी येथे दोन प्लॉट असून ते आई व चुलत भावाच्या नावावर आहेत. सदर प्लॉटच्या दस्तऐवजातील नावात बदल आणि त्याचे सबडिव्हीजन करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. परंतु प्रक्रिया बंद झाली. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागेल, अशी कारणे सांगून आरोपींनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाडोळे यांनी लाचलुचपत विभागाला दिली.
गोंदिया जिल्ह्यात सालेकसा तालुक्यातील पिपरिया या गावात फोटोग्राफीचा व्यवसाय करणारे तक्रारकर्ते हे ग्रामविकास अधिकारी देवचंद लक्ष्मण मानकर (४९) याच्या सागण्यावरून सालेकसा पंचायत समितीच्या आदेशानुसार सप्टेंबर २०१२ मध्ये पिपरीयाअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) लाभार्थ्यांच्या कामाच्या नोंदवहीच्या नुतनीकरणाकरिता ४८४ लाभार्थ्यांचे फोटो काढले. त्या कामाचे १३ हजार ४९६ रूपयांचे बिल त्यांनी पिपरीया ग्राम पंचायतकडे सादर केले. ते बिल मंजून न झाल्याने सदर छायाचित्रकाराने २० दिवसांपूवी आरोपी ग्रामविकास अधिकारी मानकरकडे विचारणा केली असता त्याने त्यांना एक हजार रूपयांची मागणी केली. दुसऱ्या दिवशी बिलाच्या रकमेचा धनादेश त्यांना दिला व एक हजार रूपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी तेथून निघून आले.
दरम्यान ग्रामपंचायत पिपरीयाअंतर्गत नवागढ येथील अतिक्रमण काढण्याच्या एप्रिल महिन्यातील कारवाईचे व्हिडीओ शूटींगचे बील देण्यासाठी १९ आॅगस्ट रोजी तक्रारकर्ते ग्राम पंचायत कार्यालयात गेले असता आरोपी मानकरने त्यांना १३ हजार ४९६ रूपयांचे बील काढून दिले त्याचे एक हजार रुपये आधी दिल्यानंतरच पुढील बिल काढून देणार, असे सांगितले. यावर सदर छायाचित्रकाराने २० आॅगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या आधारे विभागाच्या पथकाने २१ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान सालेकसा येथील ए.टी.एस. फोटो स्टुडिओमध्ये सापळा लावला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार गोपाल गिऱ्हेपुंजे, दीपक दत्ता, राजेश शेंद्रे, तोषंत मोरे, योगेश उईके, देवानंद मारबते व महिला पोलीस शिपाई तनुजा मेश्राम यांनी यशस्वी केली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Four bribe arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.