संदीप वराळ हत्या प्रकरणी प्रविण रसाळसह चौघांना अटक
By Admin | Updated: May 17, 2017 07:20 IST2017-05-17T07:19:23+5:302017-05-17T07:20:41+5:30
प्रविण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.

संदीप वराळ हत्या प्रकरणी प्रविण रसाळसह चौघांना अटक
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पारनेर, दि. 17 - राज्यभर गाजलेल्या संदीप वराळ हत्याकांडातील मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड, निघोज ग्रामपंचातचा सदस्य प्रविण रसाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांना पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथून नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पारनेर पोलिस स्टेशनच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ताब्यात घेतले.
21 जानेवारी रोजी दुपारी निघोजच्या बसस्थानकाजवळ माजी सरपंच संदीप वराळ यांची प्रविण रसाळच्या टोळीने निर्घूण हत्या केली होती. या प्रकरणात पोलीसांनी मुख्य मारेकरी विकास रसाळ, नागेश लोखंडे व पाच जणांना अटक केली होती. मात्र मुख्य सुञधार प्रविण रसाळ गेल्या चार महिन्यापासुन पोलीसांना सापडत नव्हता.
प्रविण रसाळ पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे असल्याचे माहिती पोलीस उपअधिक्षक आनंद भोईटे , पारनेर पोलिस ठाणे निरीक्षक हनुमंत गाडे यांना मिळाली. पारनेर पोलिस ठाणचे पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, संजय मातोंडकर यांच्यासह पो. कॉ. अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, खेडकर, गोसावी, हिंगडे, सातपुते, पवार, बर्डे, भोपळे यांच्या पथकाने सापळा रचून वराळला अटक केली. प्रविणसह इतर आरोपींच अटकेसाठी वराळ समर्थकांनी 25 मे रोजी नगर पुणे महार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा दिला होता.