मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर चार गाडयांचा भीषण अपघात
By Admin | Updated: December 27, 2016 16:10 IST2016-12-27T08:52:38+5:302016-12-27T16:10:01+5:30
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर चार गाडयांचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने येणा-या लेनमध्ये खालापूरजवळ चार गाडया परस्परांवर धडकल्या

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर चार गाडयांचा भीषण अपघात
ऑनलाइन लोकमत
खालापूर, दि. 27 - मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर चार गाडयांचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने येणा-या लेनमध्ये खालापूरजवळ चार गाडया परस्परांवर धडकल्या. यात दोन ट्रेलर, बस आणि ट्रकचा समावेश आहे. सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या चारही गाडया एकामागोमाग एक येत असताना त्यांच्यामध्ये धडक दिली. एक ट्रक पलटी झाला असून, एका ट्रेलरच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. छायाचित्रांवरुन अपघाताच्या भीषणतेची कल्पना येते. अपघातामध्ये किती जिवीतहानी झाली त्याची माहिती मिळू शकलेली नाही.