गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

By Admin | Updated: August 20, 2016 20:21 IST2016-08-20T20:19:56+5:302016-08-20T20:21:39+5:30

2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.

The foundations of the success of the Lok Sabha elections by winning Goa - Amit Shah | गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

गोवा जिंकून लोकसभा निवडणुकीच्या यशाचा पाया रचा - अमित शहा

 

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २० - गोवा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 जागा जिंकायलाच हव्यात असे उद्दीष्ट या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे गोवा भाजपला ठरवून दिले. 2017 साली गोवा जिंकून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी यशाचा पाया भाजपच्या कार्यकत्र्यानी गोव्यात रचावा, असे आवाहन शहा यांनी केले.
भाजप गोव्याला भ्रष्टाचारमुक्त शासन देईल. गेल्या साडेचार वर्षात आमच्या पक्षाने गोव्याला स्थिर सरकार दिले. आयाराम-गयारामांचे हे सरकार नव्हते. अनेक कल्याणकारी योजना सरकारने लोकांसाठी राबविल्या. 2क्12 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 21 जागा मिळाल्या होत्या. यावेळच्या निवडणुकीत 27 जागा मिळायलाच हव्यात. बूथस्तरीय कार्यकत्र्यानी निर्धार केल्यास 27 मतदारसंघात भाजप निश्चितच जिंकेल, असे शहा म्हणाले. 
पणजीपासून जवळच असलेल्या बांबोळी येथील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात भाजपच्या हजारो कार्यकत्र्याच्या सहभागाने संमेलन पार पडले. शहा हे त्यावेळी कार्यकत्र्याना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. संतोष व्यासपीठावर होते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 सालची लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पणजीतच झाली होती. आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण गोव्यासह अन्य काही राज्यांमध्ये 2017 साली निवडणुका होणार आहेत. 2017 साली भाजपने गोवा जिंकला की, देशभर एक चांगला संदेश जाईल. 2019 साली पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली जाईल. त्यावेळच्या यशासाठी गोवा जिंकणो अत्यावश्यक आहे, असा मुद्दा शहा यांनी मांडला. बूथस्तरावरील कार्यकर्ते ही भाजपची खरी शक्ती आहे, असे शहा म्हणाले.
गोव्याच्या निवडणुका जिंकण्याचे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहत आहे पण देशभर गलितगात्र झालेल्या या पक्षास गोव्यात जिंकणो शक्यच होणार नाही. मनोहर र्पीकर यांना गोव्याने देशाची सेवा करण्यासाठी केंद्रात पाठवले आहे. ते दिल्लीत असले तरी, त्यांचे लक्ष कायम गोव्यातच असते. मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात र्पीकर चांगल्या प्रकारे काम करत आहेत, असे शहा म्हणाले. गोव्यातील भाजपची संघटना मजबूत असून ती कौतुकास पात्र आहे, असे उद्गारही शहा यांनी काढले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: The foundations of the success of the Lok Sabha elections by winning Goa - Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.