केईएम रुग्णालयात आढळला मृतदेह
By Admin | Updated: March 16, 2016 14:06 IST2016-03-16T14:06:04+5:302016-03-16T14:06:04+5:30
केईएम रुग्णलयात एका वृद्ध नागरिकाचा मृतदेह आढळला आहे. 72 वर्षीय दत्तात्रय कांबळे यांचा हा मृतदेह असून त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरु होते अशी माहिती मिळाली आहे

केईएम रुग्णालयात आढळला मृतदेह
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १६ - केईएम रुग्णालयात एका वृद्ध नागरिकाचा मृतदेह आढळला आहे. 72 वर्षीय दत्तात्रय कांबळे यांचा हा मृतदेह असून त्यांच्यावर रुग्णलायात उपचार सुरु होते अशी माहिती मिळत आहे. आज सकाळी ओपीडीमधील शौचालयात त्यांचा मृतदेह आढळला. ह्रदयविकाराने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल.